spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – संदीप वाघेरे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून घडलेल्या दुर्घटने प्रकरणी पर्यावरण विभागाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

यासंदर्भात संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे की, मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत कोसळण्याची घटना घडली. या घटनेत 23 जण अडकून पडले होते त्यापैकी 15 जणांची सुटका करण्यात आली.मात्र एकाचा मृत्यू झाला आठ जण अजूनही अडकले आहेत. एनडीआरएफने, अग्निशामक दल यांनी बचाव कार्य चांगल्या पद्धतीने केले आहे कचरा मागच्या बाजूने हटवून प्रवेश करण्याचा आणि बचाव कार्य प्रभावी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कचऱ्यामुळे मिथेन वायूचे प्रमाण जास्त आहे.बचाव कार्य सुरू आहे . मात्र बचाव कार्यासाठी अधिक यंत्रणा लावणे गरजेचे होते . ती न लावल्याने अनेक निरपराध लोकांचे, गरीब कामगारांचे जीव गेले आहेत . असे वाघेरे म्हणाले.
पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे हा डोंगर कोसळल्याचे आयुक्त सांगत आहेत मात्र पावसामुळे हा डोंगर कोसळून दुर्घटना घडू शकते याची महापालिकेला कल्पना नव्हती का आणि पर्यावरणाचे नावाखाली दुकानदारी करणारे अधिकारी संजय कुलकर्णी आणि अल्हाट तसेच ठेकेदार एंथनी काय करत होते असा सवाल वाघेरे यांनी केला आहे. याप्रकरणी पर्यावरण विभागाचा अधिकारी संजय कुलकर्णी आणि आल्हाट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडकरांचे कराचे लाखो रुपये बायोमायनिंग वर खर्च झाले. त्यातून फलनिष्पत्ती काहीच झाली नाही. उलट मोशी येथील दुर्घटनेमुळे काहींचे जीव गेले. महापालिकेची बदनामी झाली. त्यामुळे संजय कुलकर्णी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!