spot_img
spot_img
spot_img

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे आज पिंपरी-चिंचवड शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने व उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करून संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांसाठी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले.

यावेळी अभय भोर अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पक्षाच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी टाळकरी विणेकरी मृदुंग वादक आणि ध्वज याचे पुष्पहार घालून पूजन केले.

या प्रसंगी दिंडी क्रमांक २०२ चा दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे सन्मान करण्यात आला. दिंडीतील वारकऱ्यांशी संवाद साधत सर्व कार्यकर्त्यांनी वारीचा आनंद घेतला तसेच काही अंतर पायी चालत वारीत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गाताई भोर, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व उद्योजक शिवाजीराव पवार, पिंपरी-चिंचवड शहर युवा अध्यक्ष बनसोडे, कामगार विभागाचे उपाध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष निरंजन मनवर, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षा रमाताई बनसोडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख रईसा पठाण, संत तुकाराम नगर उपाध्यक्षा इंद्रायणी गायकवाड, शहर क्रीडा उपाध्यक्षा रूपाली निकम, पुणे शहर उपाध्यक्षा दिपाली चव्हाण, शहर संघटक शांतीलाल डांगी, युवती अध्यक्षा अवंतिका भोर, जिल्हा सचिव माही शेख तसेच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजसेवा, मानवता आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या पवित्र वारीत सहभागी होत वारकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याची भावना दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!