spot_img
spot_img
spot_img

कचऱ्याची बादली ठेवण्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्याला मारहाण

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरीतील सद्गुरूनगर परिसरात कचऱ्याची बादली पायऱ्यांजवळ का ठेवली, या किरकोळ कारणावरून एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला संकल्प लॅब येथे काम करत असताना आरोपी प्रदीप (वय अंदाजे २३) याने कचऱ्याची बादली पायऱ्यांजवळ ठेवण्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ढकलून दिल्याने महिलेच्या पोटाला व डोक्याला दुखापत झाली.

या घटनेप्रकरणी भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!