spot_img
spot_img
spot_img

थेरगावमध्ये कोयत्यासह तरुण ताब्यात; गंभीर गुन्ह्याच्या तयारीचा संशय

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत धारदार कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने थेरगाव येथे ताब्यात घेतले. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास काळेवाडी स्मशानभूमीजवळ गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कारवाई केली. यावेळी समीर शराफत उस्मानी (वय २०, रा. जगतापनगरजवळ, थेरगाव) हा धारदार लोखंडी कोयता बाळगून संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.

पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या १४ दिवसांच्या प्रतिबंधात्मक आदेशादरम्यान शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही आरोपी कोयत्यासह फिरत होता. त्याच्याकडे कोयता आढळल्याने तो एखादा गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!