spot_img
spot_img
spot_img

मोशीत एका रात्रीत दोन दुकानांवर डल्ला; ४१ हजारांची रोकड लंपास, तिघांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशीतील बोराडेवाडी परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत दोन दुकानांचे शटर उचकटून ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास रिद्धी सिद्धी ट्रेडिंग कंपनी व कृष्णाई दूध डेअरी या दुकानांचे शटर उचकटून आरोपींनी आत प्रवेश केला. दुकानातील काऊंटरच्या ड्रॉवरमधील रोकड चोरून नेण्यात आली. या चोरीत एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला.

याप्रकरणी प्रदीप सुरेश शेळके (वय ५२, रा. बोराडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजित बाळासाहेब जाधव (१९), विवेक विनोद राम (१९) यांच्यासह यश पवार (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!