spot_img
spot_img
spot_img

हॉटेलसमोरून टीव्हीएस रायडर दुचाकी चोरी; ८० हजारांचे नुकसान

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाची टीव्हीएस रायडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ८.१५ वाजण्याच्या दरम्यान निघोजे गाव हद्दीतील हॉटेल शिवतेज (ता. खेड) येथून फिर्यादी पवन विष्णू दिवटे (वय २१, व्यवसाय चालक) यांची टीव्हीएस रायडर दुचाकी (एमएच २१ सीएल ०६८७) अज्ञात चोरट्याने लंपास केली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ८० हजार रुपये असून, फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!