spot_img
spot_img
spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ताडी दुकानावर संयुक्त कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील एका ताडी विक्री केंद्रावर पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान ताडीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संबंधित ताडी दुकानातील पेय पदार्थांची गुणवत्ता आणि नियमांचे पालन याबाबत शंका उपस्थित झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, तत्पूर्वी संबंधित दुकानावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, बेकायदेशीर किंवा नियमबाह्य मद्यविक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!