spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोबाईल चोरीच्या संशयातून मजुराची हत्या; आरोपीला पोलिसांनी केली अटक

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब

मोबाईल चोरीच्या संशयातून एका ४२ वर्षीय व्यक्तीची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मोई गावातील गुरुकृपा हाऊसिंग सोसायटीमधील एका घरात ही घटना घडली. आरोपी हरलाल सुभाषचंद्र गौतम (वय २८) याने आपला मोबाईल चोरीला गेल्याच्या संशयावरून चांद याकूब शेख (वय ४२) यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने चांद शेख यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!