पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दक्षिण महाळुंगे पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-४ ने कारवाई करत एका युवकाला १ किलो ४७ ग्रॅम गांजासह अटक केली आहे. आरोपीकडून ५२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील ज्ञानवर्धिनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पवनकुमार संजय साह (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १ किलो ४७ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ५२ हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




Total Users : 226893