spot_img
spot_img
spot_img
spot_img

पावसातही कर्तव्यावर ठाम: सागर कोकणे यांच्या वतीने वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर अविरत सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने नगरसेवक सागर खंडूशेठ कोकणे यांच्या वतीने सांगवी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ (नाना) काटे यांच्या हस्ते पार पडला. पावसाळ्यात वाहतूक नियमन करताना पोलिसांना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या सेवेत अधिक सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्यासह पै. अजय कदम, विशाल नाचपल्ले, मयुर गोडांबे, भूषण इंगवले, प्रशांत देवकाते, विष्णू गुंठे, सुमित सूर्यवंशी, अक्षय म्हेत्रे आणि सुरज चावरे उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेचे कौतुक करत, कोणतीही परिस्थिती असो, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

नगरसेवक सागर कोकणे यांनी सांगितले की, “समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या सुख-दुःखाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या सेवेला सलाम म्हणून हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला.”

या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत, पोलीस दलाबद्दल समाजात आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करणारा हा उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!