spot_img
spot_img
spot_img
spot_img

ताथवडेत गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद; वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

ताथवडे परिसरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. मनोज कुमार जोखैराम पाल (वय 26, रा. लोंढे वस्ती, ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी मार्गावरील दांगे चौक उड्डाणपुलाजवळ संशयित हालचाली करणाऱ्या आरोपीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. शस्त्रावर उत्पादकाचे नाव अथवा ओळख दर्शविणाऱ्या खुणा नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून आरोपी शस्त्र बाळगत असल्याचे समोर आले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!