spot_img
spot_img
spot_img

रूमच्या वादातून दगडफेक अन् हाणामारी; तरुण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

भोसरीतील सद्गुरूनगर परिसरात भाड्याच्या खोली आणि वीज कनेक्शनच्या वादातून झालेल्या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चव्हाण (वय २२) हे राहत असलेल्या खोलीचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. अजय यांनी ते पुन्हा सुरू केल्यानंतर याचा राग मनात धरून आकाश सुर्वे आणि विशाल सुर्वे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

यानंतर अजयचा भाऊ विजय चव्हाण जाब विचारण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अजय चव्हाण यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या बाजूकडूनही स्वतंत्र तक्रार दाखल झाल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!