spot_img
spot_img
spot_img

रावेतमध्ये २२१ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ ची कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

रावेत परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका युवकाला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून २२१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ११ हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल गावकरी थाटसमोरील फुटपाथ आणि रावेत पंपिंग स्टेशन परिसरात संशयित व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत सुरजकुमार रामलल्लु गुप्ता (वय ३१) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्या ताब्यात २२१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. आरोपी हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!