spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कलम 37 लागू; 7 जुलैपर्यंत जमावबंदी

प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड

पिंपरी, दि. 24 जून 2026 : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सहआयुक्त सारंग आवाड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अंतर्गत आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार 24 जून 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 7 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रे, स्फोटके, दाहक पदार्थ, दगड, काठ्या, तलवारी आदी घातक वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रेत किंवा प्रतिमा जाळणे, मोठ्याने घोषणा देणे, आक्षेपार्ह भाषणे करणे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे साहित्य प्रसारित करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

कलम 37 (3) नुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास तसेच पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र शासन सेवेत असलेल्या व कर्तव्यपूर्तीसाठी शस्त्र बाळगण्याची अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!