spot_img
spot_img
spot_img

सुखावणी आर्या सोसायटीसमोरील पाणी साचण्याच्या समस्येची दखल; सागर कोकणे यांची पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रभागातील छत्रपती चौक ते तापकीर मळा रोडवरील सुखावणी आर्या सोसायटीसमोर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची नागरिकांनी केलेली तक्रार लक्षात घेऊन नगरसेवक सागर कोकणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

यावेळी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या उपअभियंता सौ. वंदना मोरे आणि कनिष्ठ अभियंता अमित पवार यांच्यासमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत स्थानिक शेतकरी नंदाभाऊ नखाते यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या हिताचा विचार करून नखाते यांनी तत्काळ सहकार्याची भूमिका घेत कामासाठी आवश्यक परवानगी देण्यास तसेच आवश्यक ती मदत करण्यास सहमती दर्शविली.

प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून विकासकामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक सागर कोकणे यांनी नंदाभाऊ नखाते यांचे आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!