spot_img
spot_img
spot_img

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण ; चिंचवडगावात विकासकामांना गती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवडगाव येथील केशवनगर परिसरात आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून आणि विकास निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण उत्साहात पार पडले. तसेच चिंचवडगावातील विविध विकासकामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

केशवनगर येथे आयोजित कार्यक्रमात नगरसेवक सुरेश भोईर यांच्यासह अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टमुळे केशवनगरसह परिसरातील क्रीडाप्रेमींना, विशेषतः युवक-युवतींना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले की, “या बॅडमिंटन कोर्टमुळे केवळ युवकांनाच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना खेळाचा आनंद घेता येईल. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा सुविधा उभारणे आवश्यक आहे.”

दरम्यान, चिंचवडगावातील लोंढेनगर येथील समाज मंदिरासह विविध विकासकामांचे भूमिपूजनही आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये संरक्षण भिंत, ड्रेनेज पाईपलाईन आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

“चिंचवडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि क्रीडा सुविधांना प्राधान्य देऊन परिसराचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” अशी ग्वाही आमदार जगताप यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदार शंकरभाऊ जगताप यांचे आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!