पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
पूर्णानगर येथील स्पाईन रोडवर रोडरेजमधून तिघांनी एका कारचालकाला अडवून त्याच्या वाहनाची काच फोडत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या नाकाला दुखापत झाली असून उत्तर महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम चोरमले व त्यांचा मित्र जयराम चोरमले हे कारने घरी जात असताना आय-१० कारमधील तिघांनी त्यांना थांबवले. “मी थांब म्हणालो तरी तू थांबला नाही, तुला खूप मस्ती आली आहे का?” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या कारची पुढील काच फोडली.
तसेच तिघांनी मिळून दोघांना मारहाण केली. कारची काच फोडणाऱ्या आरोपीने हातातील कड्याने शुभम चोरमले यांच्या नाकावर वार करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.




Total Users : 227455