spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये 8.76 लाखांचा गुटखा साठा जप्त; एकाला अटक, तिघे फरार

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 8 लाख 76 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तिघे आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा चौकाजवळील मोकळ्या जागेत साठवून ठेवलेला ‘रेमो’ पान मसाला आणि ‘बीके-120’ सुगंधित तंबाखू असा मोठा साठा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. जप्त मालाची एकूण किंमत 8.76 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी रेयान नोमान खान याला अटक करण्यात आली असून रुस्तम खान, बाबर खान आणि गौस मोहिद्दीन कमालशा ऊर्फ ‘बाबा भाई’ यांचा पोलीस शोध घेत आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!