spot_img
spot_img
spot_img

नेहरूनगरमध्ये गांजासह संशयितावर कारवाई; 155 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब

नेहरूनगर परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कारवाई करत गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजरत बिलाल ईदगाह कब्रस्तानासमोरील मोकळ्या जागेत हर्षल ऊर्फ गब्बर रामदास पवार (वय ३२) हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून १५५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त अंमली पदार्थाची किंमत सुमारे ११ हजार ७५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!