spot_img
spot_img
spot_img

लेबरच्या वादातून हॉटेलमध्ये राडा; बिअरची बाटली डोक्यात फोडून कामगार जखमी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

खेड तालुक्यातील वासुली गाव परिसरात लेबरच्या कामावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. दोन जणांनी एका कामगाराच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास वासुली गाव हद्दीतील सुंदरबन हॉटेल येथे फिर्यादी अक्षय दिनकर भोगाडे (वय 30) यांच्यासोबत आरोपी संदीप वाबळे आणि विजय कांबळे यांनी लेबर संदर्भात विनाकारण वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी अक्षय भोगाडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व कानाला दुखापत झाली.

या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!