पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चाकण परिसरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान चाकण उत्तर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर छापा टाकून दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून 358 ग्रॅम गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकण गाव हद्दीतील धाडगे मळा परिसरात लक्ष्मीपुत्र बंगल्याजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी अली साजीद सिकिलकर (वय 20) व संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा (वय 26) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे 18 हजार 100 रुपये किमतीचा 358 ग्रॅम गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजासह मोटारसायकल जप्त केली आहे.
या प्रकरणात निखिल उर्फ दादया कांबळे, सलमान इनामदार, संकेत कौटकर आणि प्रविण जाधव उर्फ बॉस हे चार संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.




Total Users : 227462