spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; निगडीतील नागरिकाची ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

शेअर मार्केटमधून मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार निगडी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात महिला आणि संबंधित बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील रहिवासी रमेश सोपानराव फाळके (वय 52) यांना ‘कनका शर्मा’ नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. आरोपी महिलेने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात एक लिंक पाठवून तथाकथित कोटक सिक्युरिटीज अॅप्लिकेशनमध्ये नोंदणी करण्यास सांगितले.

त्यानंतर ऑनलाइन शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले. मात्र गुंतवलेली रक्कम किंवा त्यावरील कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन: सोशल मीडियावरील अनोळखी लिंक, गुंतवणुकीच्या ऑफर आणि हमखास नफ्याची आश्वासने यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची पडताळणी करावी.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!