spot_img
spot_img
spot_img

आळंदीत गांजा सेवन करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई; एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

आळंदी येथील योगीराज चौक परिसरात गांजाचे सेवन करताना आढळलेल्या एका रिक्षाचालकाविरुद्ध दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी सायंकाळी 4.40 वाजण्याच्या सुमारास योगीराज चौक येथील बसस्टँडजवळील मोकळ्या जागेत अधिराज विठ्ठल पंडीत (वय 25) हा गांजा या मादक अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. आरोपी हा व्यवसायाने रिक्षाचालक असून आळंदी परिसरात वास्तव्यास आहे.

दिघी पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम 27(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ सेवनाविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून आळंदी व परिसरात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!