spot_img
spot_img
spot_img

दापोडीत तिनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांवर कारवाई, मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

दापोडीतील जयभीमनगर परिसरात सुरू असलेल्या तिनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चौघांविरोधात कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 26 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एसआरए स्कीममधील नव्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत काही जण तिनपत्ती नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दापोडी पोलिसांनी छापा टाकला.

कारवाईदरम्यान कृष्णा यादव, राकेश जाधव, दिपक साळुंखे आणि विशाल ओव्हाळ हे चौघेजण आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.

याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!