spot_img
spot_img
spot_img

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून कौटुंबिक वाद; बांबूने मारहाण करत चौघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांनीच नातेवाईक दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ काळुराम पाडाळे (वय 52, व्यवसाय चालक, रा. लोकमान्य कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 15 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असताना फिर्यादी यांनी “कॅमेरे फक्त या भागात बसविणार की संपूर्ण इमारतीत?” असा प्रश्न विचारला.

यावरून आरोपी शुभम पाडाळे याने संतापून फिर्यादीला शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. त्यानंतर पार्किंगमधील बांबू उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.

तसेच आरोपी सुनिता पाडाळे यांनी फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर काळुराम पाडाळे आणि सुशीला पाडाळे यांनीही फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत पती-पत्नी जखमी झाले असून वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!