spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिटी प्लाझा लॉज परिसरात पुन्हा कारवाई; अनैतिक व्यवसायाच्या संशयावरून महिलेविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरीतील सिटी प्लाझा लॉज परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधातील कारवाईदरम्यान आणखी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौक मार्गावरील सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर संबंधित महिला येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना शब्द उच्चारून, डोळ्यांनी खुणावत तसेच लैंगिक हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती.

या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होऊन शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिला आरोपी फरार असून तिचा शोध सुरू आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून परिसरात विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!