spot_img
spot_img
spot_img

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुनावळे येथील गायकवाडनगर परिसरात घडली. या प्रकरणी रावेत पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शर्मा आणि त्यांचा मित्र ओमकार शिखरे हे दुचाकीवरून हिंजवडीकडे जात होते. अॅडमव्हिले सोसायटीसमोरील रस्त्यावर भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून अचानक वळण घेतले. त्यामुळे दुचाकी ट्रकला धडकून दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात ओमकार शिखरे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

रावेत पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!