पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आळंदी पोलीस ठाण्याने गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन महिलांविरोधात कारवाई केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील आळंदी फाटा परिसरात, राजतारा हॉटेललगतच्या भिंतीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल अमित अनिल डिखळे यांच्या फिर्यादीवरून फुXXX जXXX राठोड (वय ३०, रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी) व साXXX सुXX राठोड (वय ६०, रा. कुरुळी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासात आरोपी फुलवंती राठोड हिच्या ताब्यातून सुमारे ४,५०० रुपये किमतीची ९० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. ही दारू दोन काळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही दारू विक्रीसाठी साXXX राXXX हिने पुरविल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


