spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका

एका महिन्यात 62 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मे 2026 महिन्यात विशेष मोहीम राबवत तब्बल 62 हजार 727 वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून 6 कोटी 76 लाख 30 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच सहपोलीस आयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईमध्ये नो-पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 19,340 वाहनांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल टोईंग कारवाई 11,580, सिग्नल जंपिंग 8,483, जड अवजड वाहनांवर 8,142 आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवर 6,539 कारवाया करण्यात आल्या. तसेच 402 मद्यधुंद वाहनचालकांवर, 1,993 मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर आणि 1,032 मॉडिफाईड सायलेंसरधारकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक व न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!