spot_img
spot_img
spot_img
spot_img

जेईई परीक्षेचा निकाल जाहीर ; शुभम कुमार देशात अव्वल, 56,880 विद्यार्थी पात्र

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आयआयटी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced) 2026 चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. आयआयटी दिल्ली विभागातील शुभम कुमार याने 360 पैकी 330 गुण मिळवत कॉमन रँक लिस्ट (CRL) मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आरोही देशपांडे हिने महिला उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

आयआयटी रुरकीने जाहीर केलेल्या निकालानुसार, शुभम कुमारनंतर आयआयटी दिल्ली विभागातील कबीर चिल्लर आणि जतैन चहर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे यंदाच्या निकालात आयआयटी दिल्ली विभागाचा दबदबा पाहायला मिळाला.

JEE Advanced 2026 साठी देशभरातून 1 लाख 87 हजार 389 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 79 हजार 694 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. 17 मे रोजी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पेपर-1 तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत पेपर-2 पार पडला.

निकालानुसार, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 56 हजार 880 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये 10 हजार 107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. देशभरातील अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला या निकालामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

JEE Advanced मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी (JoSAA) मार्फत होणाऱ्या समुपदेशन आणि जागावाटप प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यानंतर त्यांना देशातील विविध आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!