spot_img
spot_img
spot_img

जुन्या वादातून चुलत्याकडून पुतण्यावर चाकूहल्ला; गळ्याला दुखापत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

आळंदी परिसरात जुन्या कौटुंबिक वादातून पुतण्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चुलता व चुलतीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सुरेश भोसले (वय ४२, रा. अशोकनगर, आळंदी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी अशोकनगर येथील त्यांच्या राहत्या परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून चुलते बाळासाहेब दादू भोसले व चुलती सुरेखा बाळासाहेब भोसले यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत दमदाटी केली.

यानंतर संतापलेल्या बाळासाहेब भोसले यांनी हातातील चाकू फिर्यादीच्या दिशेने फिरविल्याने त्यांच्या गळ्याला दुखापत झाली. घटनेनंतर जखमींनी आळंदी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!