spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनी आदर्श समोर ठेवून शिक्षणामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुणे महानगर पालिका युनियन आयोजित पुणे महानगर पालिकेतील सफाई कामगार व मेहत्तर वाल्मिकी समाजाचा मेळावा स्थळ – राजीव गांघी ई लर्निंग अकॅडमी,विजय तेंडुलकर सभागृह. पर्वती दर्शन येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात संघटनेच्या वतीने सत्कार मूर्ती अण्णा साहेब बनसोडे ( उपाध्यक्ष – विधानसभा महाराष्ट्र राज्य ) यांना तुकाराम महाराज यांची पगडी, शाल व विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमचे अध्यक्ष आयु. गोपालराव तंतरपाळे हे होते.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पुणे महापालिकेतील सफाई कामगारांचा तसेच विशेष आदर्श माता यांचा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कामगार नेते. मा.सुनिल शिंदे नगरसेवक यांचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व कठोर, परिश्रम सातत्य आणि समाजाप्रतिक भावना जोपासनाचे आव्हान केले.

मा. बनसोडे साहेबांनी महानगर पालिकेतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न व उच्च न्यायालयाचा निकाल या संदर्भात आयुक्त साहेबांना सांगून एका महिन्याच्या आत न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी सफाई कामगार व मेहत्तर वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. या प्रसंगी नगरसेवक निलेश आल्हाट, सौ. वैशालीताई भालेराव, नगरसेविक.सुनिल शिंदे,नगरसेवक .सुरज लोखंडे, नगरसेवक दिलीपभाऊ काळोखे मा.नगरसेवक मा.सचिन तावरे, प्रशांत लोखंडे, विकास कुचेकर (संस्थापक अध्यक्ष ह्यूमन राईट्स )
कविराज संघेलिया, डॉ. अनुपकुमार बेगी, नरोत्तम चव्हाण, कणव चव्हाण, महेंद्र चव्हाण, मा.मनोज लालबिगे (बारामती ) मा.अनिल जेधे (साहित्यकार ) रवि वाघेला, बालाजी आळंदीकर,(परभणी ) व इतर मान्यवर उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे आयोजन परवीनताई लालबिगे
महाराष्ट्र राज्य प्रमुख इंडियन क्राईम कन्ट्रोल कौन्सिल
कार्यक्रमाचे निमंत्रक – राष्ट्रीय अध्यक्ष सतीश लालबिगे
धर्मेंद्र सडेकर,ज्ञानेश्वर माने,आनंद भिंगारदिवे,रवि बेंगळे,सूर्यकांत यादव, तेजस्विनी सडेकर, शोभा भांडगे यांनी केले.

सूत्र संचालन तेजस्विनी सडेकर यांनी केले
नगरसेवक निलेश आल्हाट नगरसेवक यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!