spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड : आम आदमी पार्टीच्या युवा अध्यक्षपदी विक्की पसोटे यांची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी विक्की पसोटे यांची शहर युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विक्की पसोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि युवकांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे शहरातील युवकांना नवी दिशा मिळेल, संघटना अधिक मजबूत होईल आणि सामाजिक कार्याला चालना मिळेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

युवा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाची विचारधारा अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविणे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि संघटन विस्तारावर भर देणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असे मत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीच्या युवा संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!