spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाली त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्त विषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला.यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी विषयास अनुसरून माहिती दिली व भविष्यातील करिअरच्या दृष्टीने सदरचे कामकाज महत्त्वाचे असलेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एमएनजीएल चे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी विद्यार्थ्यांना कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्लंबर्स इच्छुक असतील तर एम. एन. जी. एल. कडून त्यांना २ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल, प्रशिक्षणानंतर त्यांना अनुभवी प्लंबर्सच्या मार्गदर्शनाखाली साईटवर प्रत्यक्ष काम शिकवले जाईल तसेच भविष्यात सी जी डी कंपन्यांमध्ये कुशल प्लंबर्सची मागणी झपाट्याने वाढणार आहे, त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडलेले प्लंबर्स हे एम.एन.जी.एल.अधिकृत व्हेंडर्स अंतर्गत काम करतील. त्यांच्या कामाच्या कार्यक्षेत्रामध्ये एम.सी.व्ही.टू.इंस्टॉलेशन, मीटर इंस्टॉलेशन, कॉपर पाईपिंग आणि किचन कन्वर्जनचे काम समाविष्ट आहे.
मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केल्यास भविष्यात तुम्ही स्वतःचे उद्योजक (Entrepreneur) देखील बनू शकता असे नमूद केले तसेच जॉब वर्कनुसार महिन्याला साधारण ७० हजार पेक्षा जास्त कमाई देखील करू शकतात असेही कळविले.

संस्थेतील साधारण ४० ते ५० प्लंबर विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याची उत्सुकता दर्शविली असून संख्या अजून वाढणार आहे, त्यांनी सदर कार्यक्रम व भरती मेळावास निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले तसेच अजून प्लंबर्स इच्छुक असतील तर त्यांनी संस्थेस संपर्क साधावा असेही आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

एम.एन.जी.एल.यांच्यामार्फत उपप्रबंधक ओम उगले व उपप्रबंधक अमोल वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाकरिता गटनिदेशक शर्मिला काराबळे, गटनिदेशक रवी ओव्हाळ, निदेशक किसन गावडे, निदेशक विक्रम काळोखे व निदेशक विशाल रेंगडे यांनी नियोजन केले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!