spot_img
spot_img
spot_img

फुगेवाडी–दापोडीत एकाच दिवशी पाच मृत्यूंनी खळबळ

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

फुगेवाडी–दापोडी परिसरात गुरुवारी दुपारपासून एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांकडून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

मृतांमध्ये पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (३१), राजेंद्र प्रकाश राठोड (३४), राजेंद्र राजपूत (५१) आणि अकबर पठाण (५२) यांचा समावेश आहे.

पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून त्यांच्यावर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विजय राठोड हा मुव्हर्स अँड पॅकर्स कंपनीत काम करत असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्याला खडकी येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

भावाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भाऊ राजेंद्र राठोड याचीही प्रकृती बिघडली. त्याला औंध रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन्ही भावांचा मृत्यू प्रथमदर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अकबर पठाण यांचा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला असून त्यांना दीर्घकाळ दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाचपैकी चार जणांना दारू पिण्याचा कोणताही इतिहास नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे. दापोडी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी वायसीएम रुग्णालयात दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!