spot_img
spot_img
spot_img
spot_img

नव्याने होणाऱ्या NEET परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्या – गौरव चौधरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पेपर फुटी मुळे NEET ची नव्याने होणारी परीक्षेसाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी यांनी निवेदन मेल करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

या निवेदनात दिनांक 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यावर्षी नीट परीक्षेबाबत निर्माण झालेल्या विविध अडचणींमुळे विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर मानसिक तणाव व चिंतेच्या वातावरणात आहे. गेल्या दोन वर्षापासून पालकांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला असून आता पालक अडचणीत आहे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रावर जाणार असल्याने हा प्रवास खर्च देखील त्यांच्यासाठी मोठा भार ठरत आहे त्यामुळे या नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या आधारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बस मध्ये मोफत प्रवासाचे सुविधा देण्यात यावी ही सुविधा परीक्षा दिनाच्या एक दिवस आधी व एक दिवस नंतर म्हणजेच दिनांक 20 जून ते 22 जून 2026 पर्यंत लागू करण्यात यावी.

हरियाणा बिहार आणि पंजाब या राज्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची सकारात्मक सुविधा उपलब्ध करून दिली आहे याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने देखील विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा संवेदनशील निर्णय घ्यावा ही विनंती या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!