spot_img
spot_img
spot_img

रहाटणीत स्पा सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची धडक कारवाई, व्यवस्थापक अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रहाटणी परिसरातील स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. “सुविधा स्पा”वर टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी रोडवरील अंबिका कॉम्प्लेक्समधील “Suvidha Spa” येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून छापा टाकला.

या कारवाईत अजित गोरख घोळप (वय ३७) याला अटक करण्यात आली. आरोपी हा स्पा सेंटरच्या माध्यमातून महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित स्पा सेंटरजवळ रुग्णालय आणि क्लिनिकसारखी सार्वजनिक ठिकाणे असतानाही हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!