spot_img
spot_img
spot_img

मोशी टोलनाक्याजवळील खून प्रकरण उघड; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून चौघांना अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी टोलनाक्याजवळील युवराज गार्डन हॉटेलमध्ये झालेल्या थरारक खून प्रकरणाचा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला.

दि. १३ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल मारुती गोळे ऊर्फ मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे भोसरी परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी नागेश काळे (२९), अजय गायकवाड (२०), अजय आव्हाड (२७) आणि दत्ता शिनगारे (३०) यांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी नितीन धोत्रे याचा शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!