spot_img
spot_img
spot_img

‘मुळशी पॅटर्न २’ची मोठी घोषणा; प्रवीण तरडेंनी दिली दमदार अपडेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

Pravin Tarde दिग्दर्शित Mulshi Pattern या गाजलेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत अखेर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. “आरारारा खतरनाक…” या डायलॉगमुळे सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

या चित्रपटात Om Bhutkar, Upendra Limaye, क्षितिश दाते, रमेश परदेशी आणि Mohan Joshi यांसारखे दमदार कलाकार झळकले होते. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर चाहत्यांकडून सातत्याने दुसऱ्या भागाची मागणी होत होती.

आता प्रवीण तरडेंनी ‘मुळशी पॅटर्न २’बाबत बोलताना सांगितले की, “देऊळ बंद २’नंतर शक्यतो मी ‘मुळशी पॅटर्न २’कडे वळेन. पहिल्या भागातून मी प्रेक्षकांना ‘शेती विकायची नसते, ती राखायची असते’ हा संदेश दिला होता. आता दुसऱ्या भागात हक्काच्या घराची गोष्ट मांडली जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “आपण मोठं घर बुक करतो, पण त्याचा हप्ता सुद्धा मोठा असतो. आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं? याचं उत्तर ‘मुळशी पॅटर्न २’मध्ये मिळेल.”

प्रवीण तरडेंनी या सिनेमाचं पूर्ण टायटलही जाहीर केलं आहे. “मुळशी पॅटर्न २ – तुमच्या घरच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट” असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. “इतका खतरनाक सिनेमा असेल की अंगावर काटा येईल,” असं सांगत त्यांनी ‘देऊळ बंद २’नंतर या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले.

त्यामुळे आता ‘मुळशी पॅटर्न २’चे शूटिंग नेमकं कधी सुरू होणार आणि हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!