पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
हिंजवडी परिसरातील नेरे दत्तवाडी येथे किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी दांपत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा दात पडला असून गळ्यातील मंगळसूत्रही तुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ भागवत कुंभार (वय ४३, रा. ढमाले नगर, नेरे दत्तवाडी) यांनी शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर मिश्रा यांना घराचा रंग सावकाश करण्यास सांगितले होते. या कारणावरून आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत लाकडी बांबू आणि दगडाने कुंभार दांपत्यावर हल्ला केला. यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून महिलेचा दात पडला. तसेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नंदकिशोर मिश्रा व त्यांच्या मेव्हण्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सपोनि वांगणेकर करीत आहेत.




Total Users : 227650