spot_img
spot_img
spot_img

रावेतमधील ‘कॅफे’वर पोलिसांचा छापा; तरुण-तरुणींना अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध केल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत परिसरातील एका कॅफेमध्ये परवानगीशिवाय संशयास्पद प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून कॅफे मालकाविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉमिनोज पिझ्झाजवळील ‘कॅफे क्रेझी लव्हर’ येथे कॉफी बोर्ड लावून वरच्या मजल्यावर अंधाऱ्या खोल्यांमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. तसेच त्या ठिकाणी अश्लील चाळे करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कॅफे मालक कैलास किसन काशिद (वय २४) याच्याविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस शिपाई अशोक वाघमारे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार पी. ए. शेलार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!