पुणे प्रतिनिधी | शंकर जोग
पुणे येथे नुकताच Vertex Healing Centre तर्फे श्रेयस बँकेट येथे भव्य-दिव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष समारंभात संस्थेच्या संचालिका Dr. Manjusha Tandekar यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, मनी रेकी ग्रँड मास्टर तसेच प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्स यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अवघ्या १७ वर्षीय Shivansh Tandekar लिखित “The Things Teenagers Don’t Say” या पुस्तकाचे प्रकाशन होय. तरुण पिढीच्या भावना, विचार आणि न बोलल्या जाणाऱ्या मनोविश्वाला स्पर्श करणाऱ्या या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयुष्यमुळे अध्यक्ष Dr. Rajan Sancheti, विंभ पब्लिकेशनचे संचालक Deepak Prabhat, नागपूर येथील भारतीय मजदूर कामगार संघाचे Shankarrao Pahade, तसेच Yograj Katbari, Sharada Katbari, मुंबई येथील यशश्री लाईफ कोच Dr. Suvarna Surve आणि अमरावती येथील Mahesh Kumar Tandekar यांची मान्यवर उपस्थिती लाभली होती.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने कार्यक्रमात सहभाग नोंदवला. संपूर्ण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून Vertex Healing Centre हे केंद्र लोकांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि मानसिक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. Dr. Manjusha Tandekar यांनी तयार केलेले विद्यार्थी आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात तसेच विदेशातही कार्यरत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत.
मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


