शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : साई सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “ग्लोबल फिल्म, बिझनेस अँड सोशल वर्क अवॉर्ड २०२६” तसेच “१०० ब्रिलियंट स्टुडंट्स अवॉर्ड” हा भव्य पुरस्कार सोहळा २३ मे २०२६ रोजी नटसम्राट निळू फुले हॉल, पिंपळे गुरव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात चित्रपट, व्यवसाय, शिक्षण, समाजकार्य, क्रीडा आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बिरेन दवे, योगेश गोंधळे आणि सुनील हिरूरकर यांच्या शुभहस्ते बन्सी आटवे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि समाजसेवेतील कार्याबद्दल “लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर स्पोर्ट्स अँड सोशल वर्क” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला अभिनेत्री स्पेंटा पटेल तसेच डॉ. भावना मंगेश यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. याशिवाय नाझिम शेख, प्रमोद शिंदे, सागर जाधव, डॉ. मदन कोथुळे, प्रा. डॉ. वृशाली रंधीर, उषा भालेराव आदी मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले असून, कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.




Total Users : 224388