spot_img
spot_img
spot_img

पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात; पजेरोच्या निष्काळजी रिव्हर्समुळे १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रावेत येथील बापदेव महाराज ब्रिज परिसरात निष्काळजीपणे रिव्हर्स घेतलेल्या पजेरो स्पोर्ट कारमुळे भीषण अपघात होऊन १० वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी रावेत पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १९ मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास स्वामी हॉटेलसमोरील पुणे-मुंबई हायवेवर घडला. आरोपी प्रशांत यशवंत म्हात्रे (वय ४५, रा. वाशी, ता. पेन, जि. रायगड) हा त्याची पजेरो स्पोर्ट (MH/43/AN/9567) कार कोणताही इशारा किंवा पार्किंग सिग्नल न देता अचानक रिव्हर्स घेत होता. त्यावेळी मागून येणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हा (MH/05/DT/2832) दुचाकीला जोरदार धडक बसली.

या भीषण धडकेत कु. स्वरा (वय १० वर्षे ६ महिने) हिच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. तसेच जयवत धावडे यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर मार लागला असून जयश्री धावडे यांच्या डोक्याला दुखापत व डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

या प्रकरणी अमित धावडे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी चालकाविरोधात बीएनएस व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!