शबनम न्यूज | प्रतिनिधी
उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणांवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मोरेवस्ती, चिखली येथे घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण वाघमारे हे मित्र अशोक कदम आणि गणेश चंदनशिवे यांच्यासह आरोपी नितीन कानगुडे याच्याकडे उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. महादेव मंदिराजवळ झालेल्या या वादात आरोपींनी तिघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी आरोपी जिजाबाई उगले हिने फिर्यादीच्या मानेवर नखाने ओरखडे काढले, तर नितीन कानगुडे याने लोखंडी रॉडने प्रविण वाघमारे यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घुले करत आहेत.




Total Users : 227659