शबनम न्यूज | प्रतिनिधी
विठ्ठलनगर परिसरातील एका खोलीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर संत तुकारामनगर पोलिसांनी छापा टाकत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील बिल्डिंग क्रमांक ८ मधील रूम नंबर २१० मध्ये काही जण पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले.
या कारवाईत ३५ हजार ७५० रुपये रोख, ४५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच पत्त्यांचे संच असा एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 227661