पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरीतील नेहरूनगर परिसरात भरदिवसा सराफा दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने तब्बल ३३ लाख ९० हजार रुपयांच्या २२ कॅरेट सोन्याच्या ३९ चेन लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषी माता चौकातील शिवम ज्वेलर्स येथे दि. २२ मे रोजी सकाळी ९.४० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. आरोपी बच्चु आशिष गागुंली (वय ३६) याने चोरीच्या उद्देशाने दुकानातून वेगवेगळ्या डिझाइनच्या आणि वजनाच्या ३९ सोन्याच्या चेन चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या सोन्याचे एकूण वजन २२५.८०० ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे ३३ लाख ९० हजार रुपये असल्याचे फिर्यादी उमेश जैन यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोउपनि पाटील करीत आहेत.




Total Users : 227670