spot_img
spot_img
spot_img

पुणे काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्याकडे नेतृत्व

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी , खासदार प्रियांका गांधी, राष्ट्रीय महासचिव के. सी . वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , पुणे शहर व जिल्हा प्रभारी सतेज पाटील तसेच माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या मान्यतेने प्रशांत जगताप आणि दीप्तीताई चौधरी यांची पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटन सृजन अभियानांतर्गत शहरातील ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली असून, काँग्रेस भवन येथे आज दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्षांनी अधिकृतपणे आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला.

समारंभानंतर माध्यमांशी संवाद साधताना विश्वजीत कदम, प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांनी पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यांसारख्या गंभीर प्रश्नांवर भाष्य केले. भारतीय जनता पक्षाच्या धोरणशून्य कारभारामुळे पुणेकर त्रस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवरील संकटांचा उल्लेख करत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“काँग्रेस नेतृत्वाने आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू,” असा विश्वास नवनियुक्त अध्यक्षांनी व्यक्त केला.

या पदग्रहण समारंभास प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपालदादा तिवारी, गटनेते चंद्रकांत कदम, नगरसेविका दिपाली डोख, सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, मोहसीन शेख, मजहर मणियार, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती शिंदे, महेबूबभाई नदाफ, रफिक शेख, साहिल केदारी, सुनील शिंदे, अश्विनी लांडगे, वैशाली भालेराव, उस्मान तांबोळी, अमीर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!