युनूस खतीब | प्रतिनिधी
आकुर्डी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ३४४ ग्रॅम गांजासह एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास सत्यम फॅब्रिकेशन शेजारील अंतर्गत गल्ली, खंडोबामाळ, आकुर्डी येथे ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई मितेश मोहन यादव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
कारवाईदरम्यान खडी मशिन झोपडपट्टी, खंडोबामाळ, आकुर्डी येथे राहणारी ५८ वर्षीय महिला आरोपी हिच्या ताब्यातून १७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सदर अंमली पदार्थ हा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. २९९/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मसपोनि आजगेकर करीत आहेत.


