spot_img
spot_img
spot_img

प्रणाली प्रकाशनचे प्रा. बी. एस्. चौधरी यांच्या आयुष्यवृक्ष पुस्तकाचे प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रा. बी. एस्. चौधरी यांच्या ‘आयुष्यवृक्ष’ या द्वितीय काव्यसंग्रहाचे प्रकाशन सौ. कुंदा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रणाली प्रकाशनच्या शामला, पंडित व्यासपिठावर उपस्थित होत्या. मान्यवरांमध्ये अथर्व थिएटर्स चे संचालक डॉ संजीवकुमार पाटील, डॉ. सौ मनिषा पाटील, चिंचवड नाट्यपरिषदेचे पदाधिकारी मा. सुहास जोशी, सौ. रोहिणी जोशी, प्रा. बी. व्ही. पाटील, प्रा. टी. बी. आफळे, प्रा. राम चौधरी अँड. ए.जे. पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ गौरी पाटील, डॉ. आदित्य पाटील , प्रणाली पंडित प्रकाशिका इ. मोठ्या संखेने आवर्जून उपस्थित होते. समारंभाचे औचित्य साधून जेष्ठ कन्या सौ. आरती पाटील हिचा सेवापूर्ती निमित्त व शामला पांडित यांचा प्रकाशनानिमित्त सौ. डॉ. ज्योतिर्मयी चौधरी यांनी शाल व बांबूचे रोप देऊन सत्कार केला. आर्किटेक्चर मध्ये पी.एच.डी. मिळवल्याब‌द्दल सुपुत्र धनंजय यांचा सत्कार श्री. शिवाजीराव पाटील यांनी केला.

या काव्यसंग्रहास प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे, डाँ बाबूराव उपाध्ये या प्रतिष्ठित साहित्यिकांच्या अभिप्राय वजा भारदस्त प्रस्तावना लाभलेल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रान्चार्य डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. सदर समारंभहॉटेल ब्लू स्काय च्या सुशोभित हॉलमधे पार पडला .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!